शोधू जाता मी तियेसी
शोधू जाता मी तियेसी


रोज येते स्वप्नी माझ्या नीज माझी उडविते.
शोधू जाता मी तियेसी तीच मजला दडविते.
हिंडता केव्हा पहाटे रेशमी गवतावरी झेळूनी
मोती दवाचे माझ्या कपोली जदविते
माखूनी ताज्या उन्हाने बहुपाशी कवलीते.
अंतरीच्या आगडोंबा चांदण्याने शमविते. &nb
sp;
शुभ्र पुर पुनवेचा, रूप ते वाटे तियेचे.
लोचनांच्या दर्प नी ती, थेट डोळे भिडविते .
सावली दिसे तिचीच कविते चे छंद, बांधी.
भाव सुमने वेचूनिया पाकळ्या ती उधलीते.
नकळे मला न केव्हा...जुळते मनात गीत.
पण गीत मात्र माझे आपुले ती म्हणविते.