STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Romance

3  

Ajinkya Guldagad

Romance

शोधतो आहे...

शोधतो आहे...

1 min
235

आज तो एकांत ....खरंच तुला शोधतो आहे...

आज तो एकांत ....खरंच तुला शोधतो आहे...

भासली नाही तळमळ एवढी....

जी आज सोचतो आहे....

क्षणिक जगलेले काळ आज....

 नव्याने उफाळू पहात आहे....

वाट ती माझी ....

होती खरी एक.... 

चुकलेल्या त्या पुन्हा ...

वाटा शोधतो आहे....

आज तो एकांत ....खरंच तुला शोधतो आहे...

प्रीती नभनक्षत्री... 

पर्जन्यासवे कोसळती....

पांघरून शाल जरी तुझी....

मृग कस्तुरी मनी भरती...

आज आसवांचे नयनी.... 

काठांत भिजत आहे....

आज तो एकांत ....खरंच तुला शोधतो आहे...

नव्यानेच होती ती सुरुवात....

नवेच होते जग सारे.....

लाख चेहऱ्यांत भासताहेत....

चांगुलपणाचे भूत सारे....

त्याच चेहऱ्यांत एक.... 

तुझ्या चेहऱ्याची आस आहे...

आज तो एकांत ....खरंच तुला शोधतो आहे...

तापलो जरी सुर्यासवे आज.. 

 तुझ्या काळोखाशी झुंज देत....

मावळेल न ज्योत ही.... 

क्षणिक साहजिक....

वाटतो जरी दिवा हा.... 

जळत वातीत मी आहे....

आज तो एकांत ....खरंच तुला शोधतो आहे...

आज तो एकांत ....खरंच तुला शोधतो आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance