STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Inspirational

3  

अमोल धों सुर्यवंशी

Inspirational

शोध आनंद या जगण्याचा

शोध आनंद या जगण्याचा

1 min
286

अंधाराचे वैर राखून ठेव

धुक्यातून हा झोत प्रकाशाचा

दुःखाच्या वाटेला श्वास सुखाचा

खेळ मांडलाय हा नियतीचा 

शोध आनंद या जीवनाचा.


छोट्या गोष्टीत मोठे समाधान

गोडी गुलाबी चे हे आंदन 

नाही दुखवले कोणास

नाही खपवून घेतले कोणी

गोड मुखाचे रस्ते बांधले आम्ही


चोचीतले दाणे वेचीत

वेचीतले दाणे चोचीत

ज्यांनी आपल्याला घडवलं 

त्यांना आपण जपायचे.

असे जगायचे,

 विरघळून जातील क्षण दुःखाचे


हसऱ्या चेहऱ्याच्या मागे

खूप काही लपून,

जगायचं बेधडक आनंद गमवून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational