सहजीवन
सहजीवन
सहजीवनाची साथ लाभली
भाग्य हे आमचे थोर
कास धरुनी मित्रत्वाची
गाठू तो पैलतीर
सहजीवन कसे जगावे
शिकावे प्राणिमात्त्राकडूनी
असतील जरी मुके ती
जगती आनंदे बोलकी देहबोली ती
आठवा मधमाश्यांचे जाळे
वारूळ मुंग्यांचे किटपतगांचे
घरटे चिमणी पाखरांचें
सहजीवन जंगली श्वापदांचे
बांधून रेशीम गाठी
वेचते सुखदुःखे एकमेकांची
खडतर प्रवास हा जीवनाचा
गोड मिठीत बांधून घेती
सहजीवनाच्या दारी नांदा सौख्यभरे भारी
सुटेना साथ ,शेवटची घटका जरी आली
हात राहूदे हातांत दोन आत्म्यांची ही जोडी जन्मोजन्मीचा तुचं खरा सहप्रवासी
जन्मोजन्मीचा तुचं खरा सहप्रवासी