STORYMIRROR

MITALI TAMBE

Inspirational

4  

MITALI TAMBE

Inspirational

शिवराय छत्रपती

शिवराय छत्रपती

1 min
393

नसानसांत येई स्फूरण अन भरून येई छाती

न भूतो न भविष्यति असे शिवराय छत्रपती


स्वाभिमानाचा झंझावात चेतविला उभ्या महाराष्ट्रात

स्वराज्याचे महत्त्व ठसविले प्रत्येक मनामनात


स्वाभिमानाने जगला न केली हाजीहाजी

प्रत्येक मावळ्यात घडविला एक एक शिवाजी


शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र अवलंबिले न्यारे

पराक्रमापुढे हतबल ठरले यवनी बादशाह सारे


आदर ठेवूनि मानिली परस्त्री मातेसमान

वासनांध नजरांनी घ्यावा हा आदर्श महान


जातीपात उच्च नीच या मुळी दिला न थारा

समानतेच्या विचारांचा अंगिकरिला नारा


आयुष्यभर जपला जिजाऊंच्या संस्कारांचा वसा

दिशदिशांत उमटविला अदभूत असा ठसा


असा तत्वनिष्ठ राजा आता होणे न दुसरा

छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational