माझा भारत
माझा भारत
भारत असे विशाल सुंदर जगी एक न्यारा
अद्भूत अफाट संस्कृतीचा हा देश मज प्यारा
समता , न्याय , समानता हे तत्व इथे चाले
मान ठेवितो थोरांचा , वंदितो संतांची पाऊले
हिंदू ,मुस्लिम ,शीख ,ईसाई मिळून राहतो सारे
विविधतेचे अमुच्या जगभर देती सर्व नारे
सणासुदीने दुमदुमून जाई येथला आसमंत भव्य
भजन अन आरतीने होते पहाट ती सुश्राव्य
अमुच्या खाद्यपदार्था असे जगभर हो मागणी
पाककला ही बघा अमुची असे चविष्ट , देखणी
वास्तू अन शिल्प
कला देती संस्कृतीची ग्वाही
ताजमहाल आश्चर्य जगाचे शोभे दिशादिशात दाही
शौर्याचीही परंपरा गाजते अमुची जगभर
भारतीय आम्ही न राहणार मागे कशात हो कणभर
अद्वितीय ही संस्कृती अमुची आम्हा असे प्रिय
जतन करण्या तिचे जनहो होऊ चला सक्रिय
भारतभूची शान वाढवू आपण सानथोर
गर्व वाटतो मायभूमीचा मनी सदा अपार
भारत माझा देश असे हे असे माझे भाग्य
या पावनभूमीत जन्मले हेच माझे सौभाग्य ,
हेच माझे सौभाग्य