मी कोण?
मी कोण?
नाही पक्षी नाही विमान
पंख आहेत मला छान
आहे तुमची आवडती
सिंड्रेलाच्या गोष्टीतली
सांगा बरं मी कोण?
नाताळ आला की मी येतो
तुमच्यासाठी खाऊ आणतो
पांढरी पांढरी मोठी माझी दाढी
गाठोड्यातून मी छान वस्तू काढी
सांगा बरं मी कोण?
ढोलकपूरचा मी आहे हिरो
भल्याभल्यांना बनवतो झिरो
खातो टूणटूण मावशीचे लाडू स्वादिष्ट
करतो वाईट अन दुष्ट गोष्टींना नष्ट
सांगा बरं मी कोण?
घडता पापांचा घडा फार
पापोमीटर वाजतो जोरदार
घडवतो पापी लोकांना अद्दल
लढवून नवनवीन शक्कल
सांगा बरं मी कोण?
मुलांना मी फार आवडते
चवीला मी गोडगोड लागते
माझ्यामुळे दात किडतात फार
आरोपाचा या माझ्यावर भार
सांगा बरं मी कोण?