विरह
विरह
तुझ्या विरह वेदनेने सखी झालो मी वेडा
कशी कळेना तुला माझ्या अंतरीची पीडा
हे प्रेम नसे फक्त हे तर स्पंदन माझ्या हृदयाचे
विरहाने तुझ्या अनुभवतो मी क्षण मरण यातनांंचे
हा विरह तुझा जाळी माझे तन अन मन
वाटे मज जणू ऐश्वर्यातही मी असे निर्धन
या विरहात सांग सखे कसे मी समजावू मनाला
समजावूनही समजेना काय म्हणावे या प्रेमाला
जो तो येतो म्हणतो मज हा तर झाला मजनू
हो हो आहे मी मजनू ,सांगा लैला कुणा म्हणू
दूर गेली सखी माझी सोडून मज एकटा
कसा चालवू एकल्याने मी जीवनाचा रेटा
तुझ्याशिवाय जगणे माझे वाटे मजला शाप
परत ये ना सखे आणिक दे मला उ:शाप
तुझ्यासोबत जीवन जगणे ही एकच होती इच्छा
तू नाही तर मरण लाभो हीच दे सदिच्छा