आहे कवी मी
आहे कवी मी
तेजस्वी सुर्यालाही जे दिसत नाही
ते पाहू शकतो मी सर्व काही
म्हणूनच सारे म्हणती जगी
जे न देखे रवी ते देखे कवी
असा मी असामी
होय , आहे कवी मी
माझ्या लेखणीची धार
करी भल्याभल्यांवर वार
तळपत्या तलवारीही लाजती
रचनेपुढे माझ्या सारेच झुकती
असा मी असामी
होय , आहे कवी मी
कवितेत माझ्या असती सर्व अलंकार
सुवर्णाहूनही चमके माझे शब्दभांडार
शब्दसंपत्ती हीच माझी श्रीमंती
वाचकांची सदा मिळे मज पावती
असा मी असामी
होय , आहे कवी मी
मजवर असे नैतिक जबाबदारी
समाजास आरसा दाखविण्याची
कवितेत असे ताकद माझ्या
बांधवाना प्रेरणा देण्याची
असा मी असामी
होय , आहे कवी मी
कविता हीच माझी आशा
कविताच माझ्या जगण्याची दिशा
वैभवच असती मज माझे शब्द
कवितेतच उजळे माझे प्रारब्ध
असा मी असामी
होय , आहे कवी मी
होय , आहे कवी मी