सामाजिक संघर्ष
सामाजिक संघर्ष
स्वतंत्र या देशात समानतेच्या तत्वाची होत आहे पायमल्ली
इथला सामाजिक संघर्ष पेटत आहे गल्ली ते दिल्ली
मोर्चेच मोर्चे निघत आहेत जातीपातीच्या नावाखाली
मानवता अन माणुसकीची होत आहे पुरती राखरांगोळी
उच्च नीच, गरीब श्रीमंत भेदभावाची वाढत आहे दरी
संधीसाधू राजकारणी मात्र डाव आपला साध्य करी
गरज आहे आज शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची
भासणार नाही निकड कुणासही मग सामाजिक संघर्षाची
समाज पोखरतात स्वार्थासाठी संघर्ष करणारे नालायक
सामाजिक संघर्षाचे ध्येय असावे निस्वार्थी अन विधायक
वर्षानुवर्षे हा समाज पोखरला आहे विषमतेच्या राक्षसाने
बदल होऊ शकला नाही इथे महापुरुषांच्या विचाराने
संविधानाने दिले आम्हांस स्वातंत्र्य, समता अन् बंधुता
सामाजिक संघर्षाने तरी नांदावी समाजात समानता