देऊ धैर्याने लढा
देऊ धैर्याने लढा
सक्षम भारताच्या आम्ही आहोत सबला नारी
मुळीच चालणार नाही आता पुरुषांची मुजोरी
वर्षानुवर्षे झेलले आम्ही समाजात दुय्यम स्थान
स्वयंसिद्धा बनूनी मिळवू जगात मान
रडणार नाही
हरणार नाही
देऊ धैर्याने लढा
मुलगा वंशाचा दिवा ही प्रथा झाली जुनी
सुशिक्षीत होऊनी घडवू आम्हीच अमुची कहाणी
मुलगी असे पणती याची जगा देऊ प्रचिती
स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याची मोहीम घेऊ हाती
रडणार नाही
हरणार नाही
देऊ धैर्याने लढा
शिक्षणासाठी अमुच्या झटल्या सावित्रीबाई फुले
त्यांचाच वसा चालवणार आम्ही त्यांचीच हो मुले
शिक्षणच आहे अमुच्या विकासाचे मूलभूत गमक
विरोधकांशी सामना करून दाखवू आमची धमक
रडणार नाही
हरणार नाही
देऊ धैर्याने लढा
p>
आमच्यामध्ये तुम्ही आपली माता भगिनी बघा
स्त्री म्हणून नाही एक माणूस म्हणूनी पहा
खपवून न घेऊ आता कोणताही कटाक्ष बोचरा
वेळीच फोडून टाकू आम्ही पुरुषी वाईट नजरा
रडणार नाही
हरणार नाही
देऊ धैर्याने लढा
कर्तृत्वाने घेऊ उंच भरारी आकाशी
आत्मनिर्भर होऊनी बाळगू आपली मिराशी
गाजवणार सर्व क्षेत्रे याची आहे आम्हा हमी
कर्तव्यात मात्र अमुच्या मुळी न पडणार कमी
रडणार नाही
हरणार नाही
देऊ धैर्याने लढा
स्त्री जन्माचा आहे आम्हा सार्थ अभिमान
स्त्रीत्व अमुची देणगी , वाटे खूप छान
अस्तित्वाच्या लढाईत आता मागे न हटणार
अनमोल या स्त्रीजन्माचे सार्थक आम्ही करणार
रडणार नाही
हरणार नाही
देऊ धैर्याने लढा