मी एक शिक्षक
मी एक शिक्षक
मी एक शिक्षक, आहे आधारस्तंभ समाजाचा
माझ्याच हातूनी घडतो भावी नागरिक उद्याचा
अंधारलेल्या वाटेवरूनी मार्गस्थ करणारा मी दीपस्तंभ
माझ्याच सोबतीने करिती शिक्षणास आरंभ
विद्यार्थ्यांची प्रगती हेच माझे संचित
आधार बनूनी प्रवाही आणतो शाळाबाह्य वंचित
करुनी संस्कारांचे रोपण मी घडवितो भावी पिढी
विज्ञानाची कास धरुनी तोडीतो अनिष्ट रूढी
भावी पिढीचा मीच आहे शिल्पकार
अनीतितूनी तारण्या समाजा माझाच आधार
मीच पेरतो मूल्ये अन नीतिमत्ता
सोबत सदैव वाढवितो विद्यार्थ्यांची गुणवत्ता
उद्धार समाजाचा हेच माझे ध्येय
अपत्यासम मज विद्यार्थी माझे प्रिय
पाहतो समाज मोठ्या आशेने माझ्याकडे
घडो सदैव सत्कृत्य हेच माझे साकडे
जन्मोजन्मी शिक्षक बनणे हेच माझे मागणे
शिक्षणसेवेत झाले सार्थक माझे जगणे
मी एक शिक्षक आहे आधारस्तंभ समाजाचा
माझ्याच हातूनी घडतो भावी नागरिक उद्याचा