Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Shidore

Inspirational

4.2  

Varsha Shidore

Inspirational

शिवराय छावा संभाजी...

शिवराय छावा संभाजी...

1 min
24.4K


स्वराज्य रक्षक दुसरा छत्रपती 

छावा संभाजी महाराज जन्मला 

सईबाई नि शिवराय पोटी पुत्र 

जिजाऊंच्या कुशीत घडला... 


कुलमुखत्यार शिर्के कन्या गुणी 

अर्धांगिनी येसूबाई झाली सखी 

प्रत्येक संघर्षात होऊन राज्ञी

विसरून सुख, सुराज्य मुखी... 


बुद्धिचातुर्याच्या तीक्ष्ण जोरावर 

भोसल्यांचा कुळ छाव्याने जपला

थोर बुधभूषण ग्रंथातून कवी मन 

वैचारिकतेचा गाडा हाकला... 


सदा प्रश्नांच्या त्याग कोठडीत

सत्यमार्गासाठी पोरका झटला

ओळखून फायद्याची राजकारण 

खेळी, मुघलांचा फास आवळला... 


शौर्यवंत मराठमोळा सर्वा मनोमनी 

फक्त रयतेच्या राज्यासाठी जगला

शेवटपर्यंत स्वकियांविरुद्धची लढाई 

प्रेम, धैर्य नि मित्रत्वाने अमर लढला... 


निस्वार्थ कर्तव्याच्या निष्ठेपुढे 

प्रजा सुखाचा धर्म नाही झुकला

निष्ठुरपणे केलेल्या अत्याचारापुढे

कीर्तिवंताचा मृत्यूही जणू हरला... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational