STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

शिवाजी

शिवाजी

1 min
489

 "गर्जा महाराष्ट्र माझा."

घेवू चला हाती भगवा झेंडा


डोक्यावरी पगडी बांधा


डफावर थाप नगारा ताल


अन् गर्जा महाराष्ट्र माझा...

छत्रपती शिवाजी महाराज


जन्मले दूर करण्याकरिता अत्याचार


केले स्थापन हिंदवी स्वराज्य त्यांनी


झाले पराक्रमी तेजस्वी ते शुरसरदार...!!


अन् गर्जा महाराष्ट्र माझा...

सत्य शिवरायाने दिली संस्कृती


अनुपम असा सूर्य आला भूतलावरी


भेटला स्वराज्याला मार्गदर्शक दमदार


शौर्य भरूनी केली अपार कामगीरी..!!


अन् गर्जा महाराष्ट्र माझा.......

शिवराया हा दुष्टांचा कर्दनकाळ


शत्रूमर्दनास शिवाने उचलली तलवार


जिजाऊचा तो लहानगा बाळगोपाळ


झालाया जगी तो महाराजा कर्तबगार...!!


अन् गर्जा महाराष्ट्र माझा.......

दुष्टांचा संहार हा करूनी दुष्मनांचा  


शिवाजीने फडशा पाडला आरपार


हिंदवी स्वराज्य स्थापन करूनीया


महापराक्रमी राजा झाला भूषणकार...!!


अन् गर्जा महाराष्ट्र माझा.......

शिवरायाने दिली खरी संस्कृती


अद्वितीय अनुपम अशी या भूवरी


असा भेटला राज्याला मार्गदर्शक


लढला तो शौर्याने समरांगनावरी...!!


अन् गर्जा महाराष्ट्र माझा.......

अफझलखानाची आतडी फाडूनी


शाहिस्ता खानाची करून बोटे सादर


रयतेसाठी असाधारण हा प्रयोग


केला शिवाजींनी असा महा चमत्कार...!!


अन् गर्जा महाराष्ट्र माझा.......

औरंगजेबाला अस्सल धडा शिकविला


मावळ्यांना घेऊनी केले वारावर वार


गनिमी कावा चक्रव्युहाची रचना करून


झाला शौर्यवान जनतेचा तारणहार.....!!


अन् गर्जा महाराष्ट्र माझा.......

परस्त्रीला दिला शिवाजीने आदर सन्मान 


गोरगरीब जनतेस सदैव दिला आधार


रूजूनी बसला मन्मनी या भारतिया


नतमस्तक होवून मानूया मनस्वी आभार....!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational