STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

शिल्पकार

शिल्पकार

1 min
213

आहे सशक्त स्त्रियाही 

सिद्ध करण्यास स्व:ला,

शक्ती तिची नाही कमी 

अधिकार सांगायला...१...


जन्म मुलींचा दाखवे 

समतोल समाजाचा, 

नका हिनवू नारीस 

नाश होईल जगाचा...२... 


करे घराचा विकास 

देई संस्काराचे धडे,

मूर्ती महान आपली 

तिच्या सानिध्यात घडे...३...


शिल्पकार जीवनाची 

नाही ओळख अबला, 

त्याग कष्ट निस्वार्थाने 

आज ठरली सबला...४...


पुढे पुढे सदा चाले 

करे सतत प्रगती, 

आयुष्याच्या संघर्षाला 

सदा लढे नारीशक्ती...५...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational