Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar

Abstract Inspirational

शिक्षणाची ज्ञानगंगा

शिक्षणाची ज्ञानगंगा

1 min
195


आठवते मजला मनापासून

माझी आवडती शाळा

ते गुरूजन, पांढरा खडू अन्

तो फळा काळा..| |ध्रृ.प.| |


शाळा माझी होती राष्ट्रीय 

कन्या शाळा तिचे नाव 

शिकले माहेरी गावी होते 

नाव ज्या चाळीसगाव 

न करी भेदभाव गोरा 

असो किंवा काळा..| |१| | 


नव्हता भेद केला जात हुशार अन्

मठ्ठ विद्यार्थ्यांत 

प्रत्येकाला मिळायची संधी ज्याचे

प्राविण्य असे ज्यात

महत्त्व ना धर्मजातीचे ध्यास

बेबंद शाहीस घालणे आळा ... | | २| |


शिस्तबद्ध पद्धतीने चालत असे

सारे कामकाज 

विद्यार्थ्यांनाच दिले जाई

महत्व चढवती सरताज 

तिच्या प्रसिद्धीसह विद्यार्थ्यांच्या

गळ्यांत पडे यशोमाळा ..| |३ | |

  

माझी शाळा होती खरी 

शिक्षणाची ज्ञानगंगा 

अजूनही आठवते मजला 

आम्ही केलेली मस्ती दंगा 

गणतंत्र स्वातंत्र्य दिनी असे

कार्यक्रमा़ंचा योग्य ताळा .. | |४| |


सांस्कृतिक कार्यक्रम,तज्ञांची

भाषणं ऐकण्याची संधी 

असभ्य वर्तणूक,भांडणांवरं 

मात्र शाळेत होती बंदी 

भास होतो मला पेपरलेखनाचा

अजूनही स्वप्नातला चाळा..| |५| | 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract