STORYMIRROR

Manisha Awekar

Romance Others

3  

Manisha Awekar

Romance Others

शीर्षक कसे सांगू तुला

शीर्षक कसे सांगू तुला

1 min
228

भाव अनामिक

मम मनातील 

कैक उसळती

कितीक दाटती     (1)


हृदय कोंदणी

प्रीत सजवली

अव्यक्त भावना

ओठीच अडली     (2)


भेटता आपण

नजरानजरी

भाव मनातील

ते हृदयांतरी       (3)


हे गूज प्रीतीचे

सांगावे तुजला

ओठी येऊनही

शब्द का अडला?    (4)


नाते हे प्रेमाचे

बंध रेशमाचे

एकरुपतेचे

प्रीतीबंधनाचे     (5)


जाणून नाथा घे

साथ दे मजला

भाव अंतरीचे

कसे सांगू तुला?    (6)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance