शीर्षक :देव माझा आई
शीर्षक :देव माझा आई
देव माझा आहे आई
नयनी तिचे रूप पाही
उणीव नसे मायेला
कोमल छत्र छायेला... 1
पोटाला चिमटा घेऊनि
रात्र दिवस कष्टकरी
घाम गाळी देई घास बाळास
तिच्या श्रमाचे बहू वाटेकरी... 2
अनवाणी चालुनी
पायी रुतवले काटे
जबाबदारी पेललीस मोठी
भरोनि अश्रूंचा कंठ दाटे.... 3
फाटकी साडी जुनी
शिवले आशेचे धागे
संसारी भासे उणीव जरी
कर्मास सोडिले मागे.....4
उपमा देण्या शब्द अपुरे
संकटे येता खंबीर उभी
खेळ जीवनाचा उदरी
शोभून दिसें मातेची छबी..
