STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

4  

Sanjana Kamat

Inspirational

शहिद

शहिद

1 min
158

जीवन हे अनमोल कर्तृत्वबाज.

ऊन,चाहूल थंडीची काट्यांची शेज.

देशाच्या सरहद्दी संरक्षणा जिगरबाज.

उब मायेची मातृभूमीची शोभे साज.


डोळस पहारा,आस देशहिताची,

कर्तव्य कठोर राखे झेंड्याची शान.

धन्य तो वीर,माता,पत्नी परिवार,

विरह सोसत,हसत करे बलिदान.


युध्दात समोर भेदभाव, विसरून,

सारे देशवासी हेच माने कुटुंब.

देत छातीवर वार,दगाबाज दुश्मना.

सीमेवर लढतो, फेडून ऋणानुबंध.


शत्रूचा खात्मा निखारा डोळ्यात,

मातृभूमीच्या रक्षणा रात्रभर जागत.

चाहूल थंडीची सरे आठवणीत,

हसतहसत शहीद जगाचा निरोप घेत.


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational