शेवटी एकटीच
शेवटी एकटीच
आयुष्यभर स्वत:च्या
अस्तित्वासाठी लढले
हतबल लाचारी मी
एकटीच हो राहिले ||१||
टाकले पाऊल जगी
जगात येताच क्षणी
प्रत्येकवेळी ऐकते
कन्या शब्द हाच कानी ||२||
सहन केले सोसूनी
राहिले खूप जपून
जगीच्या अशा द्वेषाला
कशीबशी मी सोसून ||३||
शिक्षण आले नशिबी
फक्त गरजेपुरते
लग्न आले हे जवळ
शिक्षण अर्धे सुटते ||४||
सगळे असती तिच्या
सारे अस्तित्वाचे धनी
सरतेशेवटी तिचा
वाली नसतोच कुणी ||५||