शेवटच्या क्षणी...
शेवटच्या क्षणी...
शेवटच्या क्षणी ही जगले तू श्वास माझे
एक नजर तुही पाहिलेस मला ..
गोंधळलेले भाव उमटले या डोळा
भेट होती शेवटचीच ती आपली
उरली श्वासात आज ही तिच मूर्ती
मनीच्या डोही खोल आर्त स्वरात
गूज बोलत मनी ऐकू येई कानात
नजरेत माझ्यासाठी अश्रुंची रेलचेल
रिती ओंझळ माझी झाले मी ही हतबल
आसवांची साठवण गिरवित भाळी कोंदण
पायी शृंखला नभीच्या ही धरेचे का मन बैचैन
काहूर काजळी दाटले डोळ्यांत पाणी
निरोपात मजकुर प्रेमाचा वाचला आता?
कळले नाही का झाले मन वैरी माझे ही
तुझ्या नजरेतील प्रिती साठी झुरले ते ही
शेवटचीच होती भेट आपली ठरलेली
वाट तुझी माझी वळणावर बदलेली
घेता ठाव मनीचा श्वास अड्खडे जनातही
बंधनात आज मी उमगली प्रिती खरी तुझी
आसुयेत तुझ्या त्या अनाहुत जपलीस खुण
मिळता नजरेतून कशी सुटली न कळे मज
अबोल भावनांचा उद्रेक मनी काहूर माजले
तू समोर असुनी मन उगाचच का झुरले
शेवटच्या क्षणी ही जगले तू श्वास माझे
बोल होते गहिरे अन मनाने अश्रु वाहिले
