STORYMIRROR

Nagesh Dhadve

Inspirational

2  

Nagesh Dhadve

Inspirational

शेवट

शेवट

1 min
2.9K


विश्वासाच्या पाठीवर
उभं राहुनी

मोकळीक क्षणांना

डोळ्यातून पाहुनी
देहातुनी झालेले जन्म
असावा "शेवट"

कोवळ्या हातांच्या
त्या स्पर्शातुनी
मिटती डोळे
मन हे भरूनी
आयुष्याच्या 
धाग्यादोऱ्यांतूनी
फुटलेला कंठ
असावा "शेवट"

वेचलेल्या त्या
आयुष्य क्षणातूनी
विचार बदलला
जगभर झेलूनी
अंत झालेल्या
या पुनर्जन्माचा
असावा "शेवट"

तांबड्या आकाशी
लागुनिया चाहुली
निसर्गाच्या पायथ्याशी
जन्मभर न्हाऊनी
उमजलेल्या कळीचा
अर्थ असावा "शेवट"

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational