किर्ती भिमाची...
किर्ती भिमाची...


किर्ती भिमाची...
किर्ती आहे भिमाची,
साऱ्या या जगात
आहे भीम आज आमच्या कोटी ह्रदयात
जन्मूनी अस्पृश्य जातीत
भीम झाला कीर्तीवान,
होणार नाही जगी या
भीमासम इथे विद्वान.
दिली धम्मदीक्षा जगाला, पेटवून धम्म ज्योत...
काळाराम मंदिर प्रवेश
माझ्या भीमाने केला ,
कोटी जनांचा उध्दार
भीमामुळेच झाला.
दिले न्याय, हक्क,अधिकार, त्यांनी संविधानात...
अस्पृश्य, बहुजनांचा
&nb
sp; भीमच खरा वाली ,
क्रांती खरी जगी या
भीमानेच मोठी केली.
बनविले माणूस आम्हा,होतो अंधारात...
परीवर्तन जगी या
भीमानेच खरे केले,
महामानवामुळे या
चवदार पाणी झाले
दिली क्रांतीची मशाल, आमच्या या हातात...
शिक्षण, संघटन, संघर्षाचा
मंत्र दिला आम्हाला,
झुकवून चरणी माथा,
करु वंदन भिमाला.
गाऊ आरती, पोवाडे,गाऊ या भिमगितं...