भारतरत्न मिळावं..
भारतरत्न मिळावं..

उठा बंधुंनो, उठा जोमाने
तुम्हा सर्वांना हे कळावं,
साहित्यरत्न अण्णाभाऊंना
हे भारतरत्न मिळावं..
हे जन्मशताब्दी वर्ष
झाला किती मनी हा हर्ष,
चला ऊठू करू संघर्ष
यश लढ्याला आपल्या यावं..
साहित्यरत्न अण्णाभाऊंना हे भारतरत्न मिळावं..
महान साहित्यकार, लोकशाहीर
किर्ती अण्णाची अजरामर
लेखनी अण्णाची तलवार
नातं त्यांच्यांशी आपलं जुळावं...
साहित्यरत्न अण्णाभाऊंना हे भारतरत्न मिळावं...
पाठपुरावा सारे कर
ू
सारे एकजुटीने उभारु,
जयजयकार अण्णांचा करू
गगन सारं हे दुमदुमून जावं
साहित्यरत्न अण्णाभाऊंना हे भारतरत्न मिळावं...
अण्णाभाऊंची महती गाऊ
बोला सारे जय अण्णाभाऊ
चला मुंबई, दिल्ली जाऊ
शासनाला बळ हे कळावं...
साहित्यरत्न अण्णाभाऊंना हे भारतरत्न मिळावं...
नाही झाला न होणार
असा महान साहित्यकार
विद्वान, लोकशाहीर
नमन अण्णाला कर हे जुळावं...
साहित्यरत्न अण्णाभाऊंना हे भारतरत्न मिळावं...