शेतसारा
शेतसारा
झालं हिरवं हिरवं रान
पिक डोलाया लागली
स्वप्न डोयातले साजनी
कशी सजाया लागली
जिनगानीले पाहा कसा
आलाय जरा धीर
पाखरांच्या चोचीत दाने
लेकराले भरव खिर
गायी ढोरं पाहा कसे
चारा खावुन तरारले
पिकं वाऱ्याच्या झुडकेने
संगीत थरारले
वाटे मले साजनी
लय निसर्गाची नवलाई
इंद्रधणुसारखे रंग
जीवनाची झाली भलाई
पाउस राजा तू असाच
देत जाय साथ
मातीत राबू दे माय
हरसाल दोन हात
पोटापान्याचा माया
प्रश्नच सुटेल सारा
देशाच्या लागेल कामी
उरलेला शेतसारा.