शेतकरी व्यथा
शेतकरी व्यथा
माझी माय भूमी
तिची मशागत केली
पाऊस पाडून ढगा
करशील का ओली
पीक येईल भरून
जग तुला दुवा देईल
येशील थोडं धावून
साथ तुझी होईल
या शेतकरी दादाला
साथ दे तू खरी
पडू दे रे पावसा आता
तुझ्या सरीवर सरी
सुकलेले माझं मन
ओलं करण्यास ये
पाहू नको तू अंत
दुःख सावरून घे
