शेतकरी राजा
शेतकरी राजा
काळ्या आईला पुजुनी
शेतकरी राजा पिकवतो
हिरवं शिवार राबूनी,
तेव्हा आपण.....
खातो घास सुखानी
राखा तुम्ही याचे भान
राबतो जेव्हा जगाचा पोशिंदा
तेव्हा मिळते ताटात भाकर
धरती आईची आपण सारी लेकरं
धरती सजली लेवूनिया
भरजरी हिरवा साज
हीच खरी सौंदर्याची खाण
शेतकरी राजा महान
नाही चुकत कर्तव्यास
मशागत करतो दिन-रात
पिकवतो सारा मळा
माझ्या शेतकरी राजा साधा-भोळा
जेव्हा बहरत धान
तेव्हा सारं कसं छान
नासत हो जोंधळ
सारा होतो हो गोंधळ
बळीराजा माझा
जातो हो कोलमडून
संसार येतो उघड्यावर
आतून पिळते हो मन
