शेतकरी - पाऊस
शेतकरी - पाऊस
वाट तुझी पाहताना
नभ येईल भरून
शेत ओसाड पडलं
बरस ना रे गर्जून ||1||
वाट तुझी पाहताना
कर्ज घेतली काढून
पिक नाही डोलावलं
हरलो नाही अजून ||2||
वाट तुझी पाहताना
दिवस संपून गेला
आता तरी बरसशी
मज विचारू लागला ||3||
वाट तुझी पाहताना
काही न लागे हातात
भुकेल्यास कसा सांगू
काही नसे पदरात ||4||
वाट तुझी पाहताना
अश्रू दाटले डोळ्यात
शिवार भिजे अश्रूंनी
कसा राहू संसारात ||5||
