STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

5.0  

Pandit Warade

Tragedy

शेती माती शेतकरी

शेती माती शेतकरी

1 min
829


माझा शेतकरी राजा

किती राबतो उन्हात

पर्वा जीवाची न करी

घाम गाळतो शेतात ।।१।।


येता मृगाचा पाऊस

आला सुगंध मातीला

रान हिरवं पाहून

जीव त्याचा आनंदला ।।२।।


होते नव्हते हातचे

सारे शेतात टाकले

खत औषधाच्या पायी

सारे दागिने विकले ।।३।।


पीक तरारून आलं

जीव हरखून गेला

भूक तहान जीवाची

बळीराजा विसरला ।।४।।


अर्धपोटी राहूनिया

अन्नधान्य पिकवतो

शेतकरी बळीराजा

साऱ्या जगाला पोसतो ।।५।।


बळी राजाच्या घामानं

होते पावन धरणी

श्रेय घेत नाही, म्हणे

सारी देवाची करणी ।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy