शब्दभाव
शब्दभाव
स्वाभिमानी मौनांमधे
काही शब्द विरून जातात,
अगतिक शब्दभावना
अश्रूंवाटे कधी पाझरतात.
असंख्य शब्दफैरी झडून
स्वतःचंच मन संपवतात,
शांत नीरव आसमंतातून
पुनरूज्जीवीत शब्द होतात.
कुठे शब्दांजली भरली तरी
थिटे घेणा-याचे हात असतात,
शब्द-मोती वेचायला
तिथे अनोळखी काक येतात.
