STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Action

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Action

शब्द

शब्द

1 min
146

प्रेमात युद्ध झाले शब्दास ताणतांना

जिंकून विश्व आला प्रेमास वाटतांना


मोठे लहान सारे जिंकून युद्ध आला

हारून ठार झाला शब्दांत भांडतांना


शब्दातल्या लढाया जिंकून तोच गेला

तोलून मापतो जो शब्दांस मांडतांना


मोठे महान योद्धे टाकून शस्त्र गेले

खोट्याच दोन थापा प्रेमात ऐकतांना


प्रेतात प्राण आला ऐकून गोड वार्ता

माणूस प्रेत झाला अपमान सोसतांना


पाऊस झेलतांना संतप्त वादळेही

झालीत चिंब ओली पाण्यात खेळतांना


प्रेमापलीकडे ना सामर्थ्य ताकदींचे

झाले फकीर राजे प्रेमास मागतांना



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action