शब्द
शब्द
आज शब्दांना शब्द झेपवत नाही,
शब्दांना अर्थाचे मोल पेलवत नाही.
उसासा टाकून शब्द वाट मोकळी करतात,
अर्थ मात्र तर्कात गात्र एक करतात.
कळूनही भार जानवतो हलक्या शब्दांचा,
अनर्थ उरतो मुक्या केविलवाण्या अर्थाचा.
शब्द च करतात सारासार मांडणी भावनांची,
मात्र घुटमळ होते न उमगलेल्या अर्थाची.
पण यात दोष शब्दाचा की अर्थाचा,
अर्थ ही कळवला जातो तो शब्दाचा.
म्हणून उचलतांना शब्दाची तलवार
अर्थ जाणून गोंजारावा हळूवार....
