शब्द शोधतो
शब्द शोधतो
गझलसदृश्य कविता...शब्द शोधतो
होऊन पुन्हा वेडा,मी शब्द ते शोधतो
रात्रीचा तो तारा, मी आसमानी शोधतो
हरवे कागदी शब्द,जोडून पुन्हा बघतो
वाटे गड्या आता, मी इश्क शोधतो
फाटे कधी कागदे,अचूक भाव न कळतो
कसे करु पुर्ण, आता मी ते प्रेम ही शोधतो
घरातील घरपण तुझ्याविना ही बघतो
लिहता लिहता, न कळत पुन्हा तुला शोधतो
तुझ्यातले काही होते जे माझे,पुन्हा सांगतो
असे काही माझे, मी आज पुन्हा पुन्हा शोधतो

