Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Deepa Vankudre

Abstract

3.8  

Deepa Vankudre

Abstract

शब्द शिल्पकार

शब्द शिल्पकार

1 min
210


शारदेचे आशिष तुला, लेखणीची छिन्नी घेऊन,

शब्दांचा शिल्पकार तू, वर्णांना आकार देऊन.. .../१/


भाव प्रस्फुटीत करून, घडविसी रचना न्यारी, 

कधी दारूण, आकांत, कधी कोमल सुकुमारी!... /२/


भावनांच्या शिंपल्यातील, मौक्तिक अक्षरांचे वेचून,

सजवतोस साहित्य माला, कल्पना अलंकार पेरून! ... /३/


केलेही आहेस सहन आघात मनी वैफल्याचे,

अव्हेरले जगाने जेव्हा, तू शब्द दिले कौशल्याचे! .../४/


कठोर घाव साहिल्यावर, लेख मूर्ती उभी राहते,

दाद मिळून तेव्हा, तुझ्या नावाची नौबत झडते! ...../५/


Rate this content
Log in