STORYMIRROR

प्रविण कावणकर

Classics

3  

प्रविण कावणकर

Classics

. शब्द माझे सोबती

. शब्द माझे सोबती

1 min
375

शब्द माझे सोबती

मनात माझ्या राहती

ओठातून कंठ दाटून

विचार वेगळे निघती//1//


शब्दाची गोडी लागली

ह्रदयात सामावुन रुतली

शब्दाविना बरेच काही

प्रयत्नात सांगून गेली//2//


अक्षरांना वळण लाभले

शब्द उमटले ध्यानीमनी

कालांतराने शब्द माझे

येती ओठातून परतुनी//3//


शब्द अपुरे पडतील

उजळणी सोबत राहून

प्रकट झालेले विचार

माझ्या लेखणीतून मांडून//4//


एकांत वाटतो तेवढा

वेळच लागतो शब्दाला

सोबत कुणी असलं

विचार लाभले मनाला//5//


दुरवर कुठेतरी हरवून

गेलो सोबत नसताना 

शब्दाची ताकद कळली

सोबतची जोड असताना//6//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics