शाळा
शाळा
समतोल आयुष्याचा
ढळू नये कधी
संकटांच्या आधी
उपायोजना
बोलावे नेहमीच
मोजके अन मधुर
साधावा सुर
संभाषणात
जपावे नात्यांना
जणू भांडे काचेचे
खेळ क्लेशाचे
थांबवावे
अंथरूण पाहून
पसरावे आपले पाय
सांगतसे माय
नेहमीच
जीवनाच्या शाळेत
शिकलो बरेच काही
अनुभवातून पाही
जीवनाकडे
संतुलन साधून
बनवू जीवन सुंदर
आनंदात भर
काठोकाठ
