शाळा
शाळा
वाटायच रोजच कंटाळवाण, सुटलो की परत कधी येणारच नाही.
तिथ असताना कधी जाणवलं नाही, ईथेच आहे सगळ काही.
वेगवेगळे खेळ आणी, स्वार्थ नसलेले मित्र होते.
सोबत किती दिवस राहणार, नशीबालाच ते खूपत होते.
रोज सकाळी मिळून मिसळून, जायचो सगळे शाळेला.
दिवस बुडालेला कळायचा नाही, वयाच्या त्या वेळेला.
वेळ होती तेव्हा आवडत नव्हते, माहिती होत नक्की बदलणार.
आयुष्य याच आठवनी वर काढायच होत, एक एक गोष्ट नव्यानं आठवनार.
आठवण आणी शाळा, दोन्ही तश्याच आहेत जसेच्या तसे.
इवलेसे पाय माती तुडवायचे तिथली, आता उमटतात बुटांचे ठसे.
ठसे ही पायासारखे, आपोआप शाळेकडे वळतात.
गावाच्या आणी घराच्या आधी, मी आलेली बातमी शाळेला कळवतात.
सतत येऊ वाटते इथे, शेवटपर्यंत येतच राहणार.
एकच आशा घेऊन जगतोय, कधी तरी सगळे त्याच शाळेसमोर तसेच उभे टाकणार.
