शाळा... चैतन्य परतले
शाळा... चैतन्य परतले
संपली सुट्टी, सुरू झाली शाळा
दिसू लागला सुविचारांचा फळा
बाईंच्या हातात पट्टीआईच्या शिस्तीचा आला कंटाळा, नको सुट्टी
ऑनलाइन शिक्षण नकोच मुळी मुले बनत चालली आळशी खुळी
असली जरी खोडी छोटीअंगठा धरून वाकून उभे रहाण्याची गंमत मोठी
दंगामस्ती पटांगणावरील खेळ मधल्या सुट्टी अगोदर डबा चोरून खायचे वेफर्स भेळ
असला जरी रुमाल, शर्टाच्या बाहीला नाक पुसायचे मिशीतल्या मिशीत शिक्षक हसायचे
बालपणीची शाळा कायम ठसली मनी कितीही मोठे झालो, ओठावर रेंगाळतात शाळेत शिकवलेले बाराखडी व गाणी
