STORYMIRROR

Suchita Kulkarni

Romance

4  

Suchita Kulkarni

Romance

सदाबहार काव्यांजली

सदाबहार काव्यांजली

1 min
378

प्रेम ही

अलवार भावना मनीची

नाती जन्माची

जपली


सुगंधी प्रेमाची

सुगंधी ही परिभाषा

मनात मनीषा

आनंदली


साथ तुझी

असावी रे सोबत

संकटावर मात

करेन


प्रेम मोरपिशी

जपले मी अंतरी

मूर्ती मनमंदिरी

वसली


स्वप्न अंतरी

सख्या तुझेच पहाते

आयुष्य मागते

ईशचरणी


गुलाबी प्रेमाचे

गुलाबी हे रंग

प्रेमात दंग

सख्याच्या


पवित्र प्रेम

अतूट हे बंधन

जुळले मन 

तुझ्यासवे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance