STORYMIRROR

Suchita Kulkarni

Inspirational

4  

Suchita Kulkarni

Inspirational

सदाबहार काव्यांजली

सदाबहार काव्यांजली

1 min
199

कवितेचो वही


जराशी भावनिक

थोडी गोरी गोमटी

थोडीशी हट्टी

मनानेच


माझी सखी

मनाने फार हळवी 

प्रेमात भुलवी

कवितेच्या


मनातील भावना

हळुवार नाजूक रेखाटते

लेखणी चालते

दिलखुलास


कवितेची वही

माझी सखी जिवाभावाची

निर्मळ मनाची

जीवनात


सुख दुःख

गुजगोष्टी तिजला सांगते

मन उकलते 

तिच्यापुढे


एकांती असता

साथ असते मजला

आनंद मनाला

देतसे


जीवापाड जपते

सदैव देते साथ

मदतीचा हात

नेहमीच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational