STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

सैराट

सैराट

1 min
169

सैराट झाले पोरं

याचा करा रे विचार,

कशाचे मायबाप

अन् कशाचे संस्कार...


बघा कशी, किती

दुनिया बिघडून गेली,

कळेना कशी औलाद

ही जन्माला आली

घडू नये ते घडतय

इथे लई न्यारं न्यारं...


लाज शरम दिली कशी

साऱ्यांनी सोडून,

गेली कशी एवढी ही

दुनिया बिघडून ?

लग्नाआधीच पोरं

कशी होते गरोदर...


जिथे तिथे पहा इथे

पाणी हे मुरतंय

कळेना कशे कोण, किती

घोटाळे करतंय

झाला आहे साराच आता

दिवसाच अंधार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational