STORYMIRROR

Smita Doshi

Inspirational

4  

Smita Doshi

Inspirational

सैनिक

सैनिक

1 min
467

सदैव सैनिका तुला पुढेच जायचे

न कधी मागे वळून पहायचे

देशासाठी स्वतःचे प्राण द्यायचे

हे तुझे च स्वतःसाठी वचन असते


देशासाठी सोडलस घरदार,आईबाप,

 पोरांना ,तरुण बायकोला

सीमेवर येते त्यांची आठवण वारंवार

पण तू असतोस अनेक योजने पार


कसल्या हाडा मासाचा। बनलासरे तू

सामान्य नाहीयेस रे तू

देशप्रेमाच्या ध्येयाने सदा तू पेटलेलाच

त्यासाठी तुझा जीव सदा वेशीला टांगलेलाच


घरी परत जायला मिळेल याची ग्यारन्टी नाही

म्हातारे आईबाप भेटतील याची खात्री नाही

तरीही करून कठोर मनाला

तू सदैव पुढेच चाललास

तुझ्या पराक्रमानं ,


तुझं घर, तुझा देश भान विसरून नाचणार

घरातल्यांची मान अभिमानाने ऊंचावणार

बायकोच्या त्यागाला न्यायमिळणार। कधीतरी फिरुनी घरी येतोस

स्वर्गीय आनंदाचा ठेवा देऊनी जातोस


त्याच आनंदाला जपून स्वजन

क्षणनक्षण तुला आठवत राहणार

सैनिका, सलाम तुला,तुझ्या त्यागाला

सलाम तुझ्या विरश्रीला

त्रिवार वंदन तुझ्या सैनिकपणाला।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational