सायकल
सायकल
जेव्हा मला पहिल्यांदा सायकल भेटली
तेव्हा माझ्या मनाला फार खुशी झाली
पहिल्याच दिवशी मी खूप मजा मारली
पंचेचाळीस किलोमीटर सायकल चालवली
सायकल माझ्यासाठी सायकलच नव्हती
माझ्या मित्रांपेक्षा ही ती जवळची होती
माझ्यासाठी ती पंख लावून होती
जिथं मी म्हणेल तिथं ती मला नेत होती
कॉलेजात माझ्यासोबत ती भटकून जात होती
मित्रांनी तिच्या बद्दल विचारलं तर लाजत होती
त्यावेळी सर्वांच्या नशिबात सायकल नव्हती
मॅरेथॉनमध्ये मला तीनं पहिला आणली होती
माझी सायकल मला कुठेही वेळेवर पोहोचवायची
कॉलेज क्लास करून मस्त खेळायला जायची
तिच्यासोबत मी जंगलात भ्रमंती करायची
खाली वेळेत तिला मी छान सजवून ठेवायची
ती माझा व्यायाम करून खूप घाम काढायची
त्यामुळे माझे शरीर स्वस्थ ठेवायची
हिरव्यागार रानातून मला ती फिरवायची
काहीही झालं तरी मला घरी बरोबर न्यायची
अशी होती सायकल माझी
गोड अनुभव व आठवण तिची
आता सवारी आहे गरीबाची
नाही काळजी पेट्रोलची
