सावली
सावली
सावली बोलली एक दिवस
दमले धावून तुझ्या मागे
आता होत आहे संध्या
भरले आहे मी रागे
नाही येणार तुझ्या सोबत
मी तर माझी राणी
आता होत तुझ्या पुढे
गाईन मी गोड गाणी
तुला नाही सोडणार कधी
तुझीच सोबत आवडे मला
बांधून ठेवण्याची लोकांना
आवडे मज तुझी कला
