सावळा
सावळा
सावळा माझा श्रीहरी
ठेवी कर कटेवरी
पुंडलिकाचा विठ्ठल
तो हा उभा विटेवरी ॥१॥
तेज त्रिलोकीचे शोभे
सुमुख साजिरे दिसे
नयनी अपार प्रेम
भक्तासाठीच वसे ॥२॥
नामयाचा सखा शोभे
चिंता भक्तांची वारीतो
ज्ञानेश्वर हृदयी जो
वास सदैव करतो ॥३॥
मनात सावळा ठसो
नको काही अन्य वार्ता
सर्व काळजी मिटली
तोची कर्ता करविता ॥४॥
जडो एक मज छंद
विठ्ठला तव नामाचा
आता नको मज काही
पिको नामात ही वाचा ॥५॥
