STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Classics Inspirational

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Classics Inspirational

सावळा हा रंग माझा

सावळा हा रंग माझा

1 min
278

सावळा हा रंग माझा ,जसं कपाशीचं शेत!

धारा मृगाच्या बरसता, कसं टरारून खुलतं!!


सावळा हा रंग माझा, जसा आषाढाचा ढग!

पाणी भरभरून नेतो, मातीला सुखावतो मग!!


सावळा हा रंग माझा, जसा गोकुळीचा हरी!

आकर्षितो गोपिकांना, वाजवून सुमधूर बासरी!!


सावळा हा रंग माझा, जशी विटेवरी माऊली!

साथ देई सकल भक्ता, संकटी हाकेत धावली!!


सावळा हा रंग माझा, जणू खोल शांत डोह!

अनाकलनीय अथांग, शोधण्याचा होई मोह!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract