सावित्रीच्या लेकी
सावित्रीच्या लेकी
सावित्रीच्या लेकी
आम्ही सावित्रीच्या लेकी
ज्ञानदिप हा सतत तेवत ठेवू
आम्ही सावित्रीच्या लेकी
आई झेललेस कष्ट
आम्हासाठी झेललेस शेण शिव्या
आम्हास तू दिला स्वाभिमान
आमचा तू जागविला अभिमान
शिक्षणाने मिळाला
आम्हास समाजात मान
शिक्षणाने मिळाली माहिती तंत्रज्ञान
आमच्या ध्येयास मिळाली दिशा
आमच्यात जागविलीस
अस्तित्वाचीआशा
स्वप्न आम्हा दिले
तू ध्येय आम्हा दिले
तू लढण्यास बळी दिले
तू जगण्यास अर्थ दिला
तू जेव्हा मिळाला शिक्षणाचा आधार माणूस म्हणून जगण्यास
मिळाला अधिकार
आता प्रगतिचे पंख
आम्ही ही पसरवू
आता ध्येयापर्यंत झेप
आम्ही ही घेवू
आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्ही सावित्रीच्या लेकी
ज्ञानदिप हा सतत तेवत ठेवू
आम्ही सावित्रीच्या लेकी