सावित्रीबाई फुले( ज्योतिबांची
सावित्रीबाई फुले( ज्योतिबांची
ज्योतिबा फुलेंची बनून सावली!
तत्कालीन रुढींशी लढत राहिली!!
ज्ञानाची उजळीत ज्योत राहिली!
मुली शिकवावया स्वत: शिकली!!१
अज्ञान -अंधाराशी खरी भिडली!
ज्ञानज्योत जी क्रांतिज्योत बनली!!२
सनातन्यांशी खंबीर देऊन टक्कर
समाजसुधारणेचं कार्य पुढे नेत!
घेईची पतिकार्यास पूर्णत: वाहून
स्री भाळावरील कलंक तो पुसत!!३
कधी शेण दगडांचा मारा चुकवत?
अस्पृश्य,अनाथांची सुश्रृषा करत!
बालविधवांना यातनांतून सोडवत!!४
दिलेस बळ, आत्मविश्वासाचे!
स्वप्न स्वाभिमानाने जगण्याचे!!
कित्येक निष्पाप वाचवून जीव!
पंख दिले प्रगतीचे टाकून नीव!!५
सुनिता,कल्पना वीरांगना ठरती!
ज्ञान पखांनी अंतराळी झेपवती!!
वारांगणा ज्या आहेच खितपत!
वाटे कडे तुमच्या डोळे लावत!!६
दिवसाढवळ्या अत्याचार सोसत!
आहे तुमच्या मदतीच्या प्रतीक्षेत!!
यावे परतून देण्या त्यांना गं न्याय!
घेऊनी ज्योतिबा,सावित्री गे माय!!७
समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची सावली बनून सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यास इतिहासात तोड नाही ही कृतज्ञतेनची शब्द सुमने!
