STORYMIRROR

Sushama Gangulwar

Inspirational Others

2  

Sushama Gangulwar

Inspirational Others

सावित्री

सावित्री

1 min
301

सावित्रीबाई फुलेंनी 

गिरवले होते पाठीवर अक्षर 

म्हणून आज बहुतांश स्त्रिया 

शिकून झाल्या साक्षर 


लोकांच्या बोलण्याची तिने 

नाही बाळगली तमा 

म्हणून तर शिकण्यासाठी 

कित्येक स्त्रियांना केले जमा 


शेण, गोट्या, दगडाने 

खाल्ला तिने अनेकांचा मार 

पण हजारो स्त्रियांना 

शिक्षणासाठी उघडे केले दार 


तिच्या उपक्रमाचे लोकांनी 

केले कित्येकदा उल्लंघन 

तरी ती निर्भीडपणे राहिली 

आपल्या कार्यावर टिकून संलग्न 


चूल आणि मूल इथून 

स्त्रियांना केले थोडेसे दूर 

तेव्हापासून स्त्रियांच्या 

जीवनाला मिळाले नवीन सूर 


स्त्री शिक्षणाचा सावित्रीने 

घेतला मनापासून वसा 

पहिली स्त्री शिक्षिका म्हणून 

तिने उमटविला ठसा 


पहिली महिला शाळा 

काढली ती पुण्यात 

स्त्रियांना साक्षर करण्याचे 

तिने ठाणले होत मनात 


समाजाने तिला किती त्रास दिले 

आणि किती बनले क्रूर 

त्यांच्यावर केली मात सावित्रीने 

म्हणून आज किती घडले कोहिनूर 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational