सावधान वसुंधरा तळपते
सावधान वसुंधरा तळपते
सावधान अरे मानवा ही वसुंधरा तळपते,
मानवाच्या दुष्कृत्यांतून,
प्राण्यांच्या ओरडण्यातून,
ढगांचा गडगडाटण्यातून,
फक्त एकच वाक्य उद्गार ते की ,
सावधान अरे मानवा ही वसुंधरा तळपते .||१||
वाऱ्याच्या झुळकीमधून,
गंगेच्या पाण्यामधून ,
सूर्याच्या किरणां मधून,
एकच वाक्य निघते की ,
सावधान अरे मानवा ही वसुंधरा तळपते .||२||
चला मिळवणी करूया
पर्यावरणाचे रक्षण ,
स्वतःपासून सुरुवात
स्वार्थ सोडूनि थोडावेळ करूया,
पर्यावरणासाठी अर्पण .
यातच तर आहे सुखी जीवनाचे समर्पण .
______शालीनी वाघ
